गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून, आठवड्याभरात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या दरातील बदल, गुंतवणूकदारांचा कल तसेच मागणी आणि पुरवठ्यातील बदल यांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत असतो. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.
जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरन झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेतील व्याजदरवाढीची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला त्यामुळे घसरणीची कारणे समोर आली आहेत. आठवड्याभरामध्ये सोन्यात सात हजार रुपयाची तर चांदीमध्ये 14 हजार रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 51 हजार रुपये तर चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 33 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
हेही वाचा- 2027 मध्ये सोन्याचा भाव इतका वाढणार की… बाबा वांगा यांच्या धक्कादायक भाकिताने जगभरात खळबळ
आगामी काळात सोने चांदीच्या दरात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष बाजारातील हालचालींकडे लागले आहे. मात्र, आठवड्याभरात झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे लग्नसराई, सणासुदी किंवा आगामी काळात सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही काहीशी दिलासादायक बाब मानली जात आहे.
विशेषतः लग्नसराई, सणासुदीचा काळ किंवा आगामी काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना तुलनेने कमी दराचा फायदा होऊ शकतो. मात्र, बाजारातील परिस्थिती सतत बदलत असल्याने सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढण्याची किंवा आणखी घसरण्याची शक्यता कायम असते.
त्यामुळे खरेदीदारांनी केवळ एका दिवसाच्या दरावर अवलंबून न राहता बाजारातील दर, स्थानिक सराफा बाजारातील किंमत, मेकिंग चार्जेस आणि इतर लागू शुल्क यांचा विचार करून खरेदीचा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. सध्या झालेली दरातील घसरण ही ग्राहकांसाठी सकारात्मक बाब असली, तरी पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या बाजारात कोणते बदल होतात, याकडे ग्राहकांसह व्यापारी आणि गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे.