पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मालमत्तेच्या वादातून एका सावत्र नातवाने आपल्याच आजीचा चाकून वार करत निर्घृण हत्या केलेली आहे. ही संपूर्ण घटना क्रांती चौकातील एका बिल्डिंगमध्ये घडली आहे. मंगल बाबूराव शिंगोरे (वय60) असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. सध्या या प्रकणी सांगवी पोलिसांनी त्यांचा सावत्र नातू ओंकार किसन शिंगोरे याला ताब्यात घेतले आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. खरं तर मालमत्तेत आपल्यालाला हिस्सा देत नाही, याच रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आलेले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू हा त्याने दोन-तीन महिन्यांपूर्वीच ऑनलाईन मागवला होता. त्याच चाकूंच्या सेटमधील एका धारदार चाकून त्याने आपल्याच आजीवर सपासप वार करत तिची हत्या केली.
हत्येनंतर केलं असं काही की…
आजीची हत्या केल्यानंतर ओंकारने पळ काढण्याऐवजी थेट सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी मयत मंगल यांच्या 38 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.