watermelon: उन्हाळ्यात बाजारात पिकलेल्या कलिंगडाचा गोंधळ प्रत्येकाला भेडसावतो. गडद हिरवे, पातळ पट्ट्यांचे की जाड साल असलेले .अनेकदा खरे गोड कलिंगड ओळखणे कठीण जाते. पण कलिंगड निवडताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर आपण सहज सर्वोत्तम आणि रसाळ कलिंगड निवडू शकतो.
पण सर्वात आधी या दोन प्रकारांचा थोडक्यात परिचय घेऊया. ज्या कलिंगडावर पातळ पट्ट्या असतात त्याला स्थानिक भाषेत ‘पट्टेरी कलिंगड’ किंवा ‘डिस्को कलिंगड’ असेही म्हणतात. व्यापारी भाषेत याला ‘क्रिमसन टाइड’ म्हटले जाते. याउलट, गडद हिरव्या रंगाचा आणि साखरेसारखा गोड असा कलिंगड ‘शुगर क्वीन’ म्हणून ओळखला जातो.
पट्टेरी कलिंगडाचे साल जाड असते, त्यामुळे हे वाहतुकीस आणि विक्रीसाठी सोयीचे असते. आतले गर गुलाबी-लालसर असून थोडे कुरकुरीत असते. ज्यांना जास्त गोड नको पण रसाळ फळ हवे आहे, त्यांच्यासाठी हे कलिंगड उत्तम पर्याय आहे. याचे सेवन करताना तुम्हाला हलकी गोडी आणि क्रंची फळाची मजा मिळते.
हेही वाचा: Sunday Holiday: भारतात रविवारच का असतो सुट्टीचा वार? ब्रिटिश काळातील मोठ्या आंदोलनामागची रंजक कथा; जाणून घ्या
शुगर क्वीन किंवा गडद हिरव्या रंगाचे कलिंगड पूर्णपणे नावाप्रमाणे गोड असते. याचे कवच पातळ असून आतले गर गडद लालसर आणि मऊ असते. याची नैसर्गिक गोडी खाणाऱ्याला लगेच लक्षात येते. जे लोक साखरेशिवाय नैसर्गिक स्वीटनेस हवे आहे, त्यांच्यासाठी गडद हिरव्या कलिंगडाचे सेवन फायदेशीर ठरते.
आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत. कलिंगडामध्ये ‘लायकोपीन’ नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयासाठी लाभदायक आणि त्वचेसाठी उपयोगी आहे. गडद लालसर कलिंगडात हे अँटीऑक्सिडंट थोडे जास्त प्रमाणात असते. शिवाय, कलिंगडामध्ये 92% पाणी असल्याने उन्हाळ्यात शरीरातील द्रवसंतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दोन्ही प्रकारांचे सेवन थकवा कमी करण्यासाठी, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे.
हेही वाचा: Healthy Breakfast Tips: उपाशी पोटी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; चुकीच्या नाश्त्यामुळे आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीराला थंडावा मिळत नाही तर त्यातून पोषक तत्त्वही मिळतात. लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि ऑफिसमध्ये थकलेल्या लोकांसाठी कलिंगड नैसर्गिक ऊर्जा देणारे फळ ठरते. याशिवाय, गोडी आणि रसाळपणा यामुळे उन्हाळ्यातील आहारात कलिंगड एक आवश्यक घटक बनतो.
तुम्ही बाजारात जाताना कलिंगड निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा: जाड साल असलेल्या पट्टेरी कलिंगडात थोडी कमी गोडी असते परंतु जास्त टिकाऊपणा असतो, तर गडद हिरव्या रंगाचा कलिंगड नैसर्गिक गोडी आणि मऊपणा देतो. आरोग्यासाठी गडद लालसर कलिंगड जास्त फायदेशीर मानले जाते, पण रसाळपणासाठी दोन्ही प्रकार उपयुक्त आहेत.
उन्हाळ्यातील गरमी आणि दहकत्या उन्हामुळे कलिंगडाचे सेवन शरीराला थंडावा, पोषण आणि ऊर्जा देणारे ठरते. त्यामुळे पुढच्या वेळी बाजारात जाताना या टिप्स लक्षात ठेवा आणि योग्य कलिंगड निवडा.