सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ची कडक नियमावली; जत्रेतील स्टॉलपासून ते महाप्रसादाचे नियोजन करण्याकरिता ‘ही’ गोष्ट बंधनकारक

अन्न व औषध प्रशासनाने तात्पुरत्या अन्न विक्रेत्यांसाठी व जत्रेत स्टॉल्स उभारणाऱ्यांसाठी एक नियमावली जाहीर केली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ची कडक नियमावली; जत्रेतील स्टॉलपासून ते महाप्रसादाचे नियोजन करण्याकरिता ‘ही’ गोष्ट बंधनकारक

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फूड डिलिव्हरी ॲप्स आणि अगदी मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनवर धडाकेबाज कारवाया केल्यानंतर आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एक विशेष नियमावली जाहीर केली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA नेहमीच जनतेला सुरक्षित अन्न मिळावे यासाठी सतर्क असते. आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांची रांग लागली असल्याने उपवासाच्या पदार्थांची आणि जत्रा-यात्रांमधील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा – ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ; आदित्य ठाकरे, अमित ठाकरे अन् अंजली दमानिया यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल

जत्रा-यात्रेतील स्टॉल्ससाठी परवाना अनिवार्य
FDA ने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार, नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात आणि जत्रा-यात्रांमध्ये उभारण्यात येणाऱ्या सर्व तात्पुरत्या स्टॉल्स आणि अन्न विक्रेत्यांना FDA चा रीतसर परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना न घेता स्टॉल लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

त्याचबरोबर नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद आणि लंगर सेवेसाठीही FDA ची नोंदणी आणि परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर मोठा दंड आकारण्यात येणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

भगरीच्या विक्रीवर विशेष लक्ष
नवरात्र आणि इतर सणांमध्ये अनेक भाविक उपवास करतात आणि उपवासासाठी भगरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दरवर्षी भगरीतून विषबाधा झाल्याच्या घटना समोर येत असतात. ही बाब लक्षात घेऊन FDA च्या विशेष पथकाने भगरीची विक्री, साठवणूक आणि गुणवत्ता यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाची भगर आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version