मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मुदत वाढवली, आता अंतिम यादी ‘या’ दिवशी जाहीर होणार

महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरिक्षणाचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने बदलले आहे. दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मुदत वाढवली, आता अंतिम यादी ‘या’ दिवशी जाहीर होणार

महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेचे (SIR) वेळापत्रक पुन्हा बदलले आहे. त्यामुळे मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी आणि हरकती नोंदवण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, मतदार यादीतील दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबरऐवजी आता 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच या दाव्यांवर सुनावणी घेणे आणि त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सहा राज्यांच्या वेळापत्रकात बदल

महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नागालँड या सहा राज्यांमध्ये मतदार यादी पुनरिक्षणाच्या मुदतीत बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आणि संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

मतदारांनी काय करावे?

ज्या नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत नाही, त्यांनी मुदतीपूर्वी नाव समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करावा. नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये चूक असल्यास दुरुस्तीची मागणी करता येईल. पात्र मतदारांनी ही संधी न गमावता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेणेही महत्त्वाचे आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number