Friday, November 07, 2025 09:41:41 AM

Devendra Fadnavis On Nayak Movie: 'नायक चित्रपटामुळे माझ्या अडचणी वाढल्या...'; अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

अक्षय कुमारने विचारले की, राजकारणातल्या आपल्या कारकिर्दीत कुठला चित्रपट किंवा कलाकार आपल्यावर प्रभाव टाकतो? त्यावर फडणवीस म्हणाले,...

devendra fadnavis on nayak movie नायक चित्रपटामुळे माझ्या अडचणी वाढल्या अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले

Devendra Fadnavis On Nayak Movie: फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी चित्रपट, राजकारण आणि प्रेरणादायी अनुभवांविषयी खुलासा केला. अक्षय कुमारने विचारले की, राजकारणातल्या आपल्या कारकिर्दीत कुठला चित्रपट किंवा कलाकार आपल्यावर प्रभाव टाकतो? त्यावर फडणवीस म्हणाले, 'चित्रपट आपल्याला संवेदना शिकवतात. ‘नायक’ हा चित्रपट मला आवडतो. अनिल कपूर त्या चित्रपटात एक दिवसाचे मुख्यमंत्री होतात आणि धाडसी निर्णय घेतात. लोक मला विचारतात, ‘तुम्ही नायकसारखं का काम करत नाही?’ मला एक दिवस अनिल कपूर भेटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की नायक चित्रपट का केलात? तुम्ही नायक आणि आम्ही नालायक असं आता लोकांना वाटू लागलंय. एक दिवसात तुम्ही इतक्या गोष्टी केल्या. एक बेंचमार्क सेट करण्याचे काम नायकने केले आहे. पण चित्रपट बघायला मला आवडतात. एकाच क्षेत्रात काम करुन तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. चित्रपट तुमच्या संवेदना जिवंत ठेवण्याचं काम चित्रपट करतात.

हेही वाचा - PM Modi calls CJI: CJI गवईंना पंतप्रधानांनी लावला फोन, हल्ल्यावर निषेध व्यक्त करत म्हणाले; ‘अशा निंदनीय कृत्यांना...

दरम्यान, फडणवीस यांना विचारले गेले की, जर तुम्ही एक दिवसाचे दिग्दर्शक झाला आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा चित्रपट बनवला, तर पहिला सीन काय असेल?” त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, 'पहिला सीन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल. त्यांनी कित्येक वर्षांच्या गुलामीनंतर स्वराज्य निर्माण केले, तो क्षण पहिल्या सीनमध्ये दाखवला जाईल.' 

हेही वाचा ST Bus: आता एसटीचे लोकेशन कळणार, 'या' ॲपद्वारे एसटीची अपडेट पाहू शकता

राजकारणातील रिअल हिरो कोण? 

तथापी, फडणवीस यांनी राजकारणातील प्रेरणादायी व्यक्तीविषयी विचारल्यावर सांगितले, 'भारताच्या राजकीय इतिहासात रिअल हिरो म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. गरीबी हटाव हा नारा सातत्याने त्यांनी पुढे नेला. गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्यरेषेखालून वर आणणे. तसेच भारताला जागतिक पातळीवर उभे करणे, हे सर्व मोदींमुळे शक्य झाले. तथापी, देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावमधील चित्रपटसृष्टीबाबत बोलताना सांगितले की, येत्या चार वर्षांत चित्रपटसृष्टीचं रूप आम्ही बदलणार आहोत. 


सम्बन्धित सामग्री