विमानतळापर्यंतचा प्रवास आता खिशाला परवडणारा, NMMT ने घेतला मोठा निर्णय

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता NMMTच्या बससेवेत महत्त्वाची भर पडणार आहे. या निर्णयामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना नेमका काय फायदा होणार, जाणून घ्या.

विमानतळापर्यंतचा प्रवास आता खिशाला परवडणारा, NMMT ने घेतला मोठा निर्णय
Navi Mumbai Airport

नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरिकांचे स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ज्या निर्णयात अंतर्गत बससेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

NMMTच्या ताफ्यात मोठी भर पडणार
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे. ज्या जुन्या डिझेल बसेसचे आयुर्मान हे संपत आल्याने पर्यावरणपूरक बसेस या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहे. ग्रॉस कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलनुसार तब्बल 160 नव्या बसेस घेतल्या जाणार आहेत. ज्यामध्ये 150 सीएनजी बसेस तर 10 वातानुकूलित इलेक्ट्रिक डबर डेकर बसेसचा समावेश करण्यात येईल.

हेही वाचा- आयकर विभागात 119 पदांवर मोठी भरती; 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज, किती मिळणार पगार?

खरं तर 2026-27 या आर्थिक वर्षात एनएमएमटीच्या 206 जुन्या बसेस या टप्प्याटप्प्याने बाद केल्या जातील. भांडवल तसेच मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या 100 बसेस स्व-खर्चाने खरेदी केल्या जातील, तर 150 सीएनजी बसेस कंत्राटदारामार्फत चालवल्या जाणार आहेत.

शिवाय केंद्राच्या पीएम ई-बस सेवा योजनेस उशीर झाल्याने 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस लवकरात लवकर भाडेतत्त्वार घेतल्या जाणार आहेत. या .या करारानुसार बस खरेदी, देखभाल, चालक, विमा आणि आरटीओ कराची जबाबदारी कंत्राटदाराची असेल, तर वाहक, नियंत्रण आणि इंधन पुरवठा NMMT करेल. जाहिरात हक्कही NMMT कडेच राहतील.

 

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number