Saturday, July 20, 2024 12:37:07 PM

Parth Pawar
पार्थ पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा पार्थ राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.

पार्थ पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा पार्थ राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला. यानंतर १० जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी लवकरच राज्यसभेवरील पक्षाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. यानंतर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत पार्थच्या नावावर विचार सुरू आहे.  प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेवरील रिक्त झालेल्या जागेवरून पार्थ निवडणूक लढवणार असल्याचे समजते.

कोण आहेत पार्थ पवार ?

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार
जन्म : २१ मार्च १९९०
वय : ३४
मावळ लोकसभा मतदारसंघ : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभूत


सम्बन्धित सामग्री