नांदेड जिल्ह्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे. तीर्थक्षेत्र माहूर जवळ भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झालेला असून या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात आज पहाटे माहूर जवळील किरोळी घाटात घडला.
परतीच्या प्रवासातच दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील काही भाविक हे रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला आलेले होते. दर्शन घेऊन ते टेम्पोने पुन्हा यवतमाळकडे परतत होते, तेव्हा हा अपघात घडलाय. किरोळी घाटातील धोकादायक आणि नागमोडी वळणावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि थेट टेम्पो खोल दरीत कोसळला.
तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आणि दरीत कोसळलेल्या टेम्पोमधून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाख केले असून त्यांच्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या दिवसात घडलेल्या या अपघातामुळे यवतमाळ आणि माहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.