देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुणांची जीवनज्योत विझली; आयशरने दुचाकीला दोन किमी फरफटत नेलं

सर्वत्र नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुण भाविकांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar Accident
Chhatrapati Sambhajinagar Accident

सर्वत्र नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुण भाविकांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. चितेपिंपळगाव शिवारातील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव आयशर ट्रक किंवा अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. नवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीची ज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानी देवीची ज्योत आणण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव गदाणा, चिमणापूर वाडी, जाफराबादवाडी व परिसरातील तरुण भाविक गुरुवारी सकाळी तुळजापूरला गेले होते. यावेळी शुभम अधाने हा देवीची ज्योत घेऊन धावत होता. तर ज्योतीवर तेल पुरविण्यासाठी त्यासोबत दुचाकीवर अक्षय राजपूत, अमोल औटे व गोरख म्हसकर हे तिघे सोबत चालले होते. इतर भाविक हे पिकअकमध्ये तीन कि.मी. अंतरावर समोर होते.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गावर आगीचे रौद्र रूप! धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकने अचानक पेट घेतला; वाहतूक विस्कळीत

दरम्यान, पाठीमागून आलेल्या एका भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय 28, रा. जाफराबादवाडी, ता. खुलताबाद) याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. तर तर गंभीर जखमी असलेल्या अमोल अशोक औटे (वय 32) व गोरख रावसाहेब म्हसकर (वय 28, दोघे रा. गोळेगाव गदाणा, ता. खुलताबाद) यांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तसेच शुभम अधाने (वय 20, रा. चिमणापूर वाडी, ता. खुलताबाद) हा जखमी आहे. धार्मिक उत्सवासाठी आनंदाने निघालेल्या तरुणांचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांमधूनही शोक व्यक्त केला जात आहे. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, वेगमर्यादेचे पालन करावे आणि रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version