Saturday, July 20, 2024 12:51:30 PM

unseasonal rain
अवकाळीचं थैमान

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार  हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

अवकाळीचं थैमान
tree fall

हिंगोली, १३ मे २०२४, प्रतिनिधी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार  हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्याने कळमनुरी शहरात रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत. रविवारी दिवसभात उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. तरीही, या पावसामुळे शेतातील भाजीपाला आणि फळबागायतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.


सम्बन्धित सामग्री