Tuesday, November 11, 2025 11:18:10 PM

Kidney Failure : अभिनेता सतीश शाहांचे 'किडनी फेल्युअर'मुळे निधन; किडनी ट्रान्सप्लांटचे धोके काय आहेत? प्रत्यारोपण केलेली किडनी कशाने फेल होऊ शकते?

मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अनेकदा कठीण असते. कारण, ती सामान्य थकवा किंवा वृद्धत्वाशी संबंधित वाटू शकतात.

kidney failure  अभिनेता सतीश शाहांचे किडनी फेल्युअरमुळे निधन किडनी ट्रान्सप्लांटचे धोके काय आहेत प्रत्यारोपण केलेली किडनी कशाने फेल होऊ शकते

Kidney Failure : प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे नुकतेच हिंदुजा रुग्णालयात किडनीच्या तीव्र आजारामुळे निधन झाले. शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून टाईप-2 मधुमेहाशी झुंज देत होते आणि त्यांच्यावर पूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) शस्त्रक्रियाही झाली होती. दुर्दैवाने, गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत वाढत गेली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंड हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो युरिया, क्रिएटिनिन आणि ॲसिडसारखे विषारी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ रक्तामधून फिल्टर करते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारख्या कारणांमुळे मूत्रपिंड खराब झाल्यास, ते विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता बिघडते.

किडनी निकामी होण्याची साधी पण गंभीर लक्षणे
मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या एका रात्रीत उद्भवत नाही; ती हळूहळू वाढत जाते. सुरुवातीची लक्षणे ओळखणे अनेकदा कठीण असते. कारण, ती सामान्य थकवा किंवा वृद्धत्वाशी संबंधित वाटू शकतात. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी लहान बदलांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. ही लक्षणे मूत्रपिंडाला लक्षणीय नुकसान झाल्यानंतर दिसू लागतात, त्यामुळे नियमित तपासण्या आवश्यक आहेत.

मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची सुरुवातीची काही लक्षणे
- सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे (रक्तात कचरा साचल्यामुळे).
- पाय, घोटे किंवा डोळ्यांभोवती सूज येणे (शरीरात द्रवपदार्थ साचल्यामुळे).
- रात्री वारंवार लघवी होणे किंवा लघवीचा रंग आणि प्रमाण बदलणे.
- भूक न लागणे, मळमळ होणे किंवा तोंडात धातूची चव येणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे (फुफ्फुसांमध्ये द्रवपदार्थ जमा होऊ शकतात).
- त्वचा कोरडी पडणे किंवा सतत खाज सुटणे (विषारी पदार्थ योग्यरित्या बाहेर न पडल्यामुळे).
- तुमची शारीरिक स्थिती बिघडण्यापूर्वी क्रिएटिनिनची पातळी तपासण्यासाठी नियमित रक्त चाचण्या आणि प्रथिनांसाठी मूत्र चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Sachin Pilgaonkar On Satish Shah: 'मृत्यूच्या काही तास आधी...'; सचिन पिळगावकरांनी केला धक्कादायक खुलासा

किडनी प्रत्यारोपणानंतरचे धोके आणि गुंतागुंत
सतीश शाह यांच्या शरीरात मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते, परंतु  एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार त्यांना अलीकडे संसर्ग झाला होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णाला नवीन जीवन देऊ शकते. मात्र, त्यासाठी आयुष्यभर काळजी आणि सतत डॉक्टरांच्या देखरेखीची गरज असते. डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावरही रुग्णाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. ही औषधे जर अचूक नसतील, तर ती रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) विपरीत परिणाम करतात आणि रुग्णांना संसर्ग (Infection) होण्याची शक्यता वाढते.

मूत्रपिंड प्रत्यारोपणाशी संबंधित काही सामान्य धोके
- शस्त्रक्रियेनंतरही अनेक वर्षांनी प्रत्यारोपित मूत्रपिंड शरीराकडून नाकारले जाणे (Rejection). (शरीराने या नव्या अवयवाला शरीराचा बाग म्हणून न स्वीकारणे)
- रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होणे.
- उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या (Cardiovascular Issues).
- मधुमेहाच्या गुंतागुंती पुन्हा दिसणे किंवा त्या अधिक बिघडणे.

हेही वाचा - Sumeet Raghavan Emotional Post : सुमीत राघवनने सांगितली 'साराभाई वर्सेस साराभाई'ची ही आठवण; म्हणाले, 'मोठा मुलगा या नात्याने....' 

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येबाबत निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा.)


सम्बन्धित सामग्री