संभाजीनगर पदवीधर निवडणूकीचे आज मतदान पार पडले यावेळी आमदार सुरेश धस यांनी आष्टा हरिनारायण मतदान केंद्रावर जाउन सहकुटूंब मतदान केले, यावेळी आमदार सुरेश धस यांनी सतिश चव्हाण हेच उमेदवार प्रथम क्रमांकवर निवडून येतील असे सांगितले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ साठी आज सकाळी 8 वाजल्यापासून सांगली जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघासाठी 159 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 48 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे शिक्षक मतदार संघामध्ये महायुतीचे कौस्तुभ गावडे विरुद्ध महाआघाडीचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यात लढत होत आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी खासदार कल्याण काळे यांनी मतदान केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी परिसरातील मनपा शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पुणे पदवीधरांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.. पदवीधरमधून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवार असून, हर्षदा देशमुख-जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवार आहेत. या दोघींमध्येच ही लढत होणार असून, भाजपने ही निवडणूक मात्र प्रतिष्ठेची केली आहे. तर, शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून, महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून, जिल्ह्यातील एकूण 56 हजार 917 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सोलापूरमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांनी सामूहिक मतदानाची तयारी केली आहे. दिलीप माने यांच्या BMIT शिक्षण संस्थेतील सुमारे 1,700 मतदार एकत्रितपणे मतदानासाठी जात आहेत. काही महिन्यांपूर्वी दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता शिक्षण संस्थेतील मतदारांना सोबत घेऊन ते मतदानासाठी मार्गस्थ झाल्याने या घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी ५० हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली असून, त्याच जोरावर विजय मिळवणार असल्याचा दावा त्यांनी केला. पहिल्या पसंतीच्या मतांवरच निवडणूक जिंकणार असल्याचे सांगत, यानंतर काँग्रेस या मतदारसंघातून पूर्णतः संपलेली असेल, असा दावाही सुधाकर कोहळे यांनी केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आपल्या विजयाबाबत शंभर टक्के विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात सातत्याने संपर्कात असल्याचा दावा करत, पहिल्या पसंतीच्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या आमदाराने मराठवाड्यातील बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि पदवीधरांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आपल्या विजयाबाबत शंभर टक्के विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात सातत्याने संपर्कात असल्याचा दावा करत, पहिल्या पसंतीच्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.. तर अमरावतीच्या उर्दू हायस्कूलमध्ये अमरावती विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी भेट देत मतदान केंद्राची पाहणी करत आढावा घेतला.. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान अधिकारी आणि शिक्षक मतदारांची संवाद साधला.
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, बुलढाणा जिल्ह्यात 9124 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या जागांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. सहकारातील सत्तेसाठी आजी-माजी आमदार आणि खासदारांसह मोठे नेते रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. विद्यमान खासदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे आणि किरण लहामटे निवडणूक लढवत आहेत. तर आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विखे-थोरात पॅनेलने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण 3,715 मतदार असून, त्यामध्ये 2,894 पुरुष शिक्षक आणि 821 महिला शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव आणि मानोरा या 6 तहसील क्षेत्रांमध्ये एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.. गोंदिया जिल्ह्यातील एकूण ३९ मतदान केंद्रावरून एकूण २२ हजार १७६ मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महायुतीत भाजपने माघार घेतली असून, महाविकास आघाडीत उद्धवसेनेने बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत होणार आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप घुगे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 38 उमेदवार असून, विभागातील 2 लाख 55 हजार 603 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि नितेश कराळे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 445 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, निवडणुकीसाठी 2 हजार 535 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी करिता पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील 58 तालुक्यामधील 62 हजार महिला पुरुष शिक्षक मतदार 310 बुथवर आपला मतदानाचा हक्क बजावणार असून प्रमुख लढत भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप, महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात आहे
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात एकूण 21349 मतदार आपला हक्क बाजावणार आहेत मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर येत आहे. महायुती कडून सुधाकर कोहळे तर महाविकास आघाडी कडून अभिजित वंजारी रिंगणात आहेत