सतिश चव्हाण आपली आमदारकी राखणार? पवार आणि शिंदेंच्या उमेदवारांचं आव्हान; मतपत्रिकेचे 80 टक्के काम पूर्ण

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील निकालाच्या पहिल्याच फेरीत मोठ्या मतांनी विजय मिळेल, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
Satish Chavan Dilip Ghuge and Pratapsingh Patil
Satish Chavan Dilip Ghuge and Pratapsingh Patil

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा उद्योगिक क्षेत्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 842 मतदान केंद्रांमधील मतमोजणीसाठी 70 टेबल मांडण्यात आल्या असून पहिला मतमोजणीच्या 13 फेऱ्या नियोजित आहेत. या निवडणुकीत 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल! 5 जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की महाविकास, आघाडी कोण बाजी मारणार?

दरम्यान, पदवीधर मतदारांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत पदवीधरांची ताकद गृहीत धरता येणार नाही, हे मतदारांनी दाखवून दिले. पहिल्याच फेरीत मोठ्या मतांनी विजय मिळेल, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पुढील दहा वर्षांत पदवीधरांसाठी काय काम करणार, याचे नियोजन जाहीरनाम्यात मांडले. विरोधीपक्षांवर टीका करण्याऐवजी स्वतःचा विकासाचा अजेंडा मतदारांसमोर ठेवला. उमेदवार पसंत पडल्याने पदवीधरांनी भरभरून मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला. ही निवडणूक पदवीधर मतदारांनी स्वतःच्या हातात घेतल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले. तब्बल 18 वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित केला. योग्य नियोजन आणि कार्यक्रमाच्या जोरावर सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुपारी १२ च्या सुमारास मतदानाच्या मतपत्रिकेचे 25 – 25 चे गठ्ठे करण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे समजते. तसेच गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तासाभरात एक लाख 91 हजार 689 मतपत्रिकेचे गठ्ठे पूर्ण होतील. त्यानंतर साधारणपणे दीड वाजता एकत्रित केलेल्या मतपत्रिकेच्या गठ्ठ्याचे टेबलवर वितरण केले जातील. पहिली फेरी अडीच ते तीन वाजता होईल, त्यात पहिला कल लक्षात येईल. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणीसाठी तीन फेऱ्या होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विधान परिषद मतदारसंघ निकाल | Maharashtra MLC Election Results

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version