महाराष्ट्र: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पत्रकार परिषदेत एक विचित्र विधान केले. ' फक्त आशिष शेलार यांना ओळखते; इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही.'; त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले आहे. पत्रकारांनी हिंदी भाषा अनिवार्य या विषयावर प्रश्न विचारले असता आशा भोसले यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आणि 'राजकारणावर मी बोलणार नाही' असेही त्यांनी सांगितले.
आशा भोसले यांची भूमिका:
'मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते... इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही,' अशी अशा भोसलेंनी ठाम भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.हिंदी अनिवार्यता प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार देत म्हटले 'राजकारणावर मी बोलणार नाही,' आणि कोणत्याही प्रकारची राजकीय टिप्पणी करणे त्यांनी टाळले.
हेही वाचा: वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी: वीजदरात 10% तात्काळ कपात, घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा
शेलार आणि भोसले कुटुंबातलं नातं:
आशिष शेलार आणि आशा भोसले यांचं नातं हे राजकीय नसून वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचं आहे.
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात:
महाराष्ट्र सरकारने इयत्ता 1 ते 5 पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या विरोधात एक मोठा जनआंदोलन उभं राहिलं आहे.
राज ठाकरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व घेतलं असून, मोर्चा 5 जुलै रोजी निघणार आहे. हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत जाईल. कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, हा मोर्चा 'मराठी माणसाचा' असेल, असं स्पष्ट केलं गेलं आहे.