मराठीच्या पदरी चौफेर यश,’कच्चा लिंबू’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदा मराठी चित्रपट आणि कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश मिळवलंय. रवी जाधव दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलंय. समीक्षकांनी […]

मराठीच्या पदरी चौफेर यश,’कच्चा लिंबू’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदा मराठी चित्रपट आणि कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश मिळवलंय. रवी जाधव दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलंय. समीक्षकांनी नावाजलेला आणि ‘ऑस्कर’ची दारं ठोठावणारा राजकुमार राव अभिनित ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालाय. यावेळी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला गेला आहे. तर 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number