Nashik Kumbhmela : पंचवटी, रामघाट, कुशावर्त परिसरात मद्यविक्रीवर निर्बंध; कुंभमेळ्याचं पावित्र्य राखण्यासाठी निर्णय

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या पाश्र्वभूमीवर रामघाट, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्री दुकानांवर निर्बंध लादण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Nashik Kumbhmela : पंचवटी, रामघाट, कुशावर्त परिसरात मद्यविक्रीवर निर्बंध; कुंभमेळ्याचं पावित्र्य राखण्यासाठी निर्णय
Nashik Kumbh Mela

नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या पार्श्वभूमीवर रामघाट, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्री दुकानांवर निर्बंध लादण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कुंभमेळ्याचे धार्मिक पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी, तसेच सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या परिसरातील मद्यविक्रीवर मर्यादा घालण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिकेकडे तातडीने अहवाल मागवला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये रामघाट, पंचवटी तसेच कुशावर्त तलाव परिसरातील 2 ते 3 किलोमीटरच्या क्षेत्रात मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याबाबत चर्चा झाली होती.

हेही वाचा : राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना लाभ

‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949’ च्या कलम 139 मधील तरतुदींनुसार आदेश निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. तसेच या प्रस्तावाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय व अधिसूचना काढण्यापूर्वी गृह विभाग व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टता मागवली आहे. यात क्षेत्रीय अंतर व कालावधीवर भर देण्यात आला आहे. रामघाट, पंचवटी व कुशावर्त परिसरातील नेमक्या किती अंतराच्या (किलोमीटर) परिसरातील मद्यविक्री परवाने बंद ठेवायचे असून नमूद क्षेत्रातील मद्यविक्री दुकाने नेमकी किती कालावधीसाठी बंद अथवा निर्बंधात ठेवायची आहेत, या विषयावर महापालिकेकडून माहिती मागविण्यात असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number