मध्य रेल्वेबाबत मोठी अपडेट! सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे पाच तासांपासून लोकल विस्कळीत; सध्या स्थिती काय?

आज मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे पाच तासांपासून लोकलसेवा विस्कळीत आहेत, याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मध्य रेल्वेबाबत मोठी अपडेट! सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे पाच तासांपासून लोकल विस्कळीत; सध्या स्थिती काय?
Central Railway

आज मध्य रेल्वेवर तब्बल 15 मिनिटे ते 1 तास उशिराने लोकल धावत होत्या. विशेषतः मुलुंड ते ठाणे दरम्यान मोठा विलंब पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेल्या पाच तासांपासून मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावर सध्या रेल्वे ट्रॅकवर ट्रेन एकापाठोपाठ एक उभ्या आहेत. यामुळे काही प्रवाशांनी वैतागून थेट रेल्वे रुळावर उतरून पायी प्रवास केल्याचेही पाहायला मिळाले.

हेही वाचा- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल; मुलुंड-ठाणे दरम्यान लोकल खोळंबली, नेमके कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली आहे. यावेळी भांडूपहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल उशिराने धावत असून, लोकल सेवा तब्बल अर्धा तास उशिराने सुरू आहे. तर मुलुंडहून मुंबईच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना झाली आहे. त्यामुळे रेल्वे सेवा पूर्ववत होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्या, तरी प्रवाशांना अद्यापही विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number