Tuesday, February 17, 2026 06:10:26 PM

Ajit Pawar Plane Crash : नेमकं कारण समोर येणार, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडीकडे?

विमान अपघाताचा तपास आता सीआयडी करण्याची शक्यता वर्तवण्यात करण्यात येत आहे.

ajit pawar plane crash  नेमकं कारण समोर येणार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडीकडे

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.  विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  केले जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडी करण्याची शक्यता वर्तवण्यात करण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठल्या ही उच्च पदस्थ व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी तपास यंत्रणा करते. त्यामुळे या अपघाताचा तपाससुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Death : 'दादा एवढे शब्दाला पक्के होते, एवढा मी देखील नाहीये...', अजित पवारांच्या निधनानंतर चंद्रशेखर बावनकुळें भावूक 

अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्स ने पार्थिव ग. दि. मा. संभागृपर्यंत नेण्यात येईल. सकाळी 9 पासून येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.


सम्बन्धित सामग्री