मुंबई : कसारा- आसनगाव दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या एका विशेष ब्लॉकमुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. 14 ते 16 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येत असून या दिवसात जळगाव, नाशिक, मनमाड, चाळीसगाव मार्गे धावणाऱ्या 5 अत्यंत महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या या वळवण्यात आलेल्या आहेत.
कोणत्या तारखांना होणार बदल?
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-कसारा या दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून आसनगाव यार्डचे विस्तारीकण हे केले जात आहे. त्यासाठी ट्रॅफिक तसेच पॉवप ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ब्लॉकची वेळ 14 ऑक्टोबरला दुपारी ठीक 3.35 ते रात्री 8.35 अशी असणार असून 15 ऑक्टोबर दुपारी 3.35 ते 7.35 आणि 16 ऑक्टोबरच्या पहाटे 3 ते सकाळी 6 तर पुन्हा दुपारी 3.35 ते 7.35 अशी असणार आहे. या घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे सेवाग्राम आणि गरीब रथसह पाच गाड्या जळगाव या स्थानकावर येणार नाहीत.
तर गाडी क्रमांक 12139 सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम 14 आणि 15 ऑक्टोबरला पुणे-मनमाड या मार्गे धावणार आहे. दुसरीकडे 12188 सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ ही एक्सप्रेस ही 15 ऑक्टोबरला पुणे मार्गे वळवली गेली आहे.
याशिवाय 12598 सीएसएमटी-गोरखूप अंत्योद्य आणि 11043 दादर-बलिया ही एक्स्प्रेस 14 ऑक्टोबरला, तर 11047 दादर-गोरखपूर एक्स्प्रेस ही 15 ऑक्टोबरला कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड या मार्गे धावणार आहे. दरम्यान, अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेला आहे. 14 ऑक्टोबरला एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-सीतापूर आणि एलटीटी-धनबाद या तीन गाड्या सुमारे सव्वा तास उशिराने सुटणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.