नवऱ्याचं धक्कादायक सत्य समोर आलं, तरी संसार वाचवण्याचा प्रयत्न! रात्री आईशी बोलली, पण दुसरा दिवस विवाहितेसाठी ठरला अखेरचा…

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरातील एन-१३ वानखेडेनगर येथे अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २३ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर- प्रतिनिधी विजय चिडे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरातील एन-13 वानखेडेनगरमध्ये नवविवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. फक्त 4 महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. जालना येथील रावसाहेब मगरे यांची धाकडी मुलगी संजना हिने कॉम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला होता.

नवऱ्याचं सत्य समोर येताच आयुष्य उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून 2026 अर्थात काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न हे नीलेश शेजवळ याच्यासह झाले होते. लग्न जुळवताना नीलेशने स्वत:ला एक शासकीय अधिकारी असल्याचे सांगितले. वडिलांनीही आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित असेल या विश्वासाने अर्ज काढून थाटामाटात लग्न ही लावून दिले. मात्र, लग्नाच्या काही दिवसात तो परदेशात विद्यार्थी पाठवणाऱ्या एका कन्सल्टमन्सीमध्ये काम करत असल्याचे घरच्यांच्या समोर आले.

हेही वाचा-अंत्यसंस्काराच्या जेवणासाठी निघाले, पण घरी परतलेच नाहीत! गंगेतील नाव दुर्घटनेने बिहार हादरलं, 13 जणांचा मृत्यू

रात्री आईला फोन अन् दुसऱ्याच दिवशी…
लग्न करताना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर ही तिने संसार सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण सासरी स्वयंपाक, राहणीमानावरुन तिला वारंवार टोमणे मारले जायचे, असा आरोपी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. घटनेच्या आदल्या रात्री तिने आपल्या आईला रडत फोन करुन होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले होते.

आईशी बोलणं झाल्याच्या दुसऱ्या दिवशी विवाहिता वरच्या मजल्यावरील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सासरच्या मंडळींनी माहिती देण्यास उशीर केल्याचा आणि रुग्णालयातून थेट निघून गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version