दूध तापवलं अन् चक्क रबरासारखा गोळा तयार झाला; मालेगावमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील ओंकार नगर परिसरात समोर आली आहे.
Malegaon Milk News
Malegaon Milk News

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील ओंकार नगर परिसरात समोर आली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने चुलीवर 25 लिटर दूध आटवताना चक्क रबरासारखा ताणला जाणारा गोळा तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातून समोर आला आहे.

हेही वाचा- रस्त्यावर पॅरालिसिसचं नाटक, इंजेक्शन काढताच सगळा अभिनय संपला; पुढे जे घडलं ते भन्नाट

तब्बल 25 लिटर दुधाचा घट्ट गोळा तयार झाल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित दूध विक्रेत्याला बोलावूनही तो उपस्थित न राहिल्याचा मंडळाच्या सदस्यांचा दावा आहे. या प्रकारामुळे संबंधित दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, मात्र, दूध भेसळयुक्त होते का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन दुधाचे नमुने तपासणार का आणि तपासणीतून नेमके काय समोर येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version