पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट! महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट; वाहतुकीसाठी कधी खुला होणार?

Pune News : पुण्यातील विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. विमानतळ, आळंदी, धानोरी आणि लोहगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, यामुळे परिसरातील वाहतुकीत मोठा बदल अपेक्षित आहे.

पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट! महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट; वाहतुकीसाठी कधी खुला होणार?
Pune News

पुणे : पुण्यातील आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकात होत असलेली वाहतूक कोंडी आता लवकरच संपणार आहे. महापालिकेने येथे सुरु केलेल्या उड्डाणूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम साधारण 85 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले आहे. मात्र, हा पूल नागरिकांसाठी नेमका कधी खुला होणार, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर मग, जाणून घेऊयात.

पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी कमी होणार
पुणे शहरातील विश्रांतवाडीचा मुकुंदराव आंबेडकर हा चौक अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणावरुन विमानतळ, आळंदी, धानोरी तसते लोहगावकडे असंख्य वाहने दररोज जात असतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे मोठी गर्दी होत असते. यात वाहतूक कोंडीत वाहनचालक तासन्तास अडकून राहतात. विशेष म्हणजे याचा त्रास विमानतळावर जाणारे प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना जास्त सहन करावा लागत होता.

हेही वाचा – मिसिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! ‘या’ वाहनांना कायमस्वरूपी बंदी; जाणून घ्या कोणाला प्रवेश?

काम करण्यासाठी अनेक अडथळे ही निर्माण झाले होते. या ठिकाणी पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन, 14 मोठ्या विजेच्या लाईन तसेच गॅसच्या पाईपलाईनचे जाळे होते. तेच हलवण्यासाठी बराच वेळ लागला शिवाय चौकातील एका धार्मिक स्थळाजवळची ही जागा मिळवण्यातही वेळ गेला, अशी माहिती समोर येत आहे.

वाहतुकीसाठी कधी सुरू?
आता या सर्व अडचणी दूर झालेल्या असून कामालाही वेग आला आहे. या उड्डाणपुलाची लांबी साधारण 650 मीटर असून रुंदी 7 मीटर आहे. तर वाय आकाराच्या असलेल्या ग्रेड सेपरेटरची लांबी ही 666 मीटर असून रुंदी 9 मीटर आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील दोन महिन्यात उर्वरित काम संपवून जानेवारी 2027 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number