मिसिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! ‘या’ वाहनांना कायमस्वरूपी बंदी; जाणून घ्या कोणाला प्रवेश?

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नवीन कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मिसिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू! ‘या’ वाहनांना कायमस्वरूपी बंदी; जाणून घ्या कोणाला प्रवेश?
Mumbai Pune Expressway Missing Link

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नवीन कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2026 पासून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा- 2-3 मिनिटं विनवणी, तरी दरवाजा उघडेना! प्रवाशांची अलोट गर्दी असताना ठाणे स्थानकात लोकलचा डबा आतून बंद

यापूर्वी हलक्या मालवाहू वाहनांना, जसे की पिकअप व्हॅन आणि टाटा एस, या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र, नव्या नियमांनुसार या वाहनांनाही बंदी लागू होणार आहे. प्रतिबंधित मालवाहू वाहनांनी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या मार्गिकेचा वापर करणे बंधनकारक असेल.

खासगी कार, जीप व इतर बिगर-वाहतूक हलकी मोटार वाहने तसेच प्रवासी बस आणि अन्य अनुमत प्रवासी वाहनांना मिसिंग लिंकचा वापर करता येईल. वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे, बोगद्यांमध्ये विशेष काळजी घ्यावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. ही अधिसूचना 1 नोव्हेंबर 2026 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number