महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! सह्याद्री एक्सप्रेसच्या सेवेत मोठा बदल; जाणून घ्या

Sahyadri Express Update : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सह्याद्री एक्सप्रेसच्या सेवेत महत्त्वाचा बदल होणार असून, यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता आहे. नेमका बदल काय आणि प्रवाशांसाठी याचा अर्थ काय, जाणून घ्या.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! सह्याद्री एक्सप्रेसच्या सेवेत मोठा बदल; जाणून घ्या
Sahyadri Express

पुणे आणि कोल्हापूर या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत फक्त विशेष गाडी म्हणून धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस ही आका कायमस्वरुपी नियमित गाडी झालेली आहे. रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिलेली असून ही गाडी नव्या नंबरने मंगळवार पासून धावणार आहे.

आता नियमित दैनिक गाडी म्हणून धावणार
मिळालेल्या माहितीनुसार, ही एक्स्प्रेस पुण्याहून कोल्हापूरला जाताना 11419 आणि कोल्हापूरहून पुण्याला येत असताना 11420 या क्रमांकाने धावणार आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण तसेच व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या आरामासाठी या गाडीला आता 18 आधुनिक एलएचबी हे डबे लावण्यातही आलेले आहेत. ज्यामध्ये एसी, स्लीपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे असणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षिततेसह आरामदायक होणार आहे.

हेही वाचा – मुंबईत जमिनीखाली सुरू आहे मोठं काम! 6 प्लॅटफॉर्म, 7 किमीचा बोगदा; नेमका मार्ग कुठून-कसा?

असे असेल वेळापत्रक
गाडी क्रमांक 11419 ही गाडी पुण्याहून दररोज रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर सकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल असून परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 11420 ही कोल्हापूरहून दररोज रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी निघणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या एक्स्प्रेसला नियमितचा दर्जा मिळाल्याने तिकीट बुकिंग आणि प्रवासाचे नियोजन करणे आता अधिक सोपे होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number