बायकोच्या वाढदिवसासाठी सोनं घ्यायला आला अन् काही वेळातच सगळं बदललं; CCTV पाहून बसेल धक्का

Satara Gold Theft : साताऱ्यातील ढेबेवाडी बाजारपेठेत दिवसाढवळ्या 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. पत्नीच्या वाढदिवसासाठी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. पाठलाग करणाऱ्यांच्या डोळ्यांत चटणीची पूड फेकून दोघे दुचाकीवरून फरार झाले. चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस तपास करत आहेत.
ज्वेलर्स दुकान चोरी
Gold Theft Video

सातारा : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी या निमशहरी गावात दिवसाढवळ्या 15 लाखांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे. बायकोच्या वाढदिवसाला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोराने मगर ज्वेलर्समधून हा ऐवज लंपास केला आहे. ही संपूर्ण चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चोरी केल्यानंतर पळून जाणाऱ्या या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र, चोरांनी पाठलाग करणाऱ्यांच्या डोळ्यात चटणीची पूड फेकून पळ काढला. हे दोघे चोरटे दुचाकीवरून फरार झाले आहेत. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या ढेबेवाडी येथील बाजारपेठेत घडलेल्या या दुसाहसी चोरीच्या प्रकारामुळे संपूर्ण ढेबेवाडी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version