मोठी बातमी! MPSC च्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता कोण संभाळणार?

MPSC विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या रजा कालावधीत सतीश वाघोले यांची MPSC च्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मोठी बातमी! MPSC च्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; विवेक भीमनवार यांचा कार्यभार आता कोण संभाळणार?
MPSC News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे सध्या पेपरलीक प्रकरणात सुट्टीवर गेले असल्यानं त्यांच्याकडंचा प्रभारी कारभार आता आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं जोपर्यंत भीमनवार हे सुट्टीवर असतील तोपर्यंत वाघोले हेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाची सुत्रं सांभाळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आले असून राज्यपालांकडून नियुक्तीबाबत अधिसूचना जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा- राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! शरद पवार गटाची साथ सोडली; तीन नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात सामील
विद्यमान अध्यक्ष विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांच्या रजेच्या कालावधीत सतीश वाघोले हे या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एमपीएससी पेपरफुटीवरुन पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा सुरु असलेल्या आंदोलनावर 11 व्या दिवशी तोडगा निघाला. सरकारने विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

त्यानंतर आता भीमनवार यांच्या अतिरिक्त पदाचा कारभार सतीश वाघोलेंकडे देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी जवळपास 9 ते 10 अधिकाऱ्यांना विचारात घेण्यात आले होते. त्यातून सतीश वाघोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर आले आहे. पेपरफुटी प्रकरणाची चौकशीसाठी एक समिती नेमली आहे. ही समितीची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. दरम्यान चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल येईपर्यंत भीमनवार रजेवर असणार आहेत. आयोगाला अहवालासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number