धक्कादायक! खेळता-खेळता चिमुकल्यांनी खाल्लं असं काही… ;7 जणांना रात्री रुग्णालयात दाखल; नेमकं प्रकरण काय?

Jalna News : जालना जिल्ह्यातील रायगव्हाण येथे मोगला सीड खाल्ल्याने सात मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. खेळताना या मुलांनी बिया खाल्ल्यानंतर त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

धक्कादायक! खेळता-खेळता चिमुकल्यांनी खाल्लं असं काही… ;7 जणांना रात्री रुग्णालयात दाखल; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra News

जालना जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आलेली आहे. खेळता-खेळता 7 लहान मुलांनी रानटी बी खाल्ल्यामुळे त्यांना गंभीर विषबाधा झालेली आहे. या घटनेमुळे रायगव्हाण गावासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

एकाच गावातील 7 मुलं आजारी
मिळालेल्या माहितीनुसार, रायगव्हाण येथील सात मुले ही त्यांच्या परिसरात खेळत होती. खेळता-खेळता त्यांना झाडांवर येरंडासारखी दिसणारी मोगला सीड नावाची रानटी बी दिलसी. ती खाण्यासाठी योग्य आहे, असे समजून त्या सातही मुलांनी ती बी खाल्ली. अवघ्या काही क्षणातच या सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा प्रचंड त्रास होऊ लागला. सातही मुलांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्यांच्या पालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा – 15 वर्षीय प्रेमप्रकरणातून घरात मोठा अनर्थ! आईचा मृत्यू अन् वडील अन् बहिणीसोबत….; घटनेने खळबळ

घटनेने पालक हादरले
पालकांनी कोणताही वेळ वाया न घालवता रात्री उशिरा सर्व मुलांना जालना येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या या सातही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुदैवाने वेळेमध्ये उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number