दिवाळीच्या खरेदीत साखरेचा खर्च वाढणार? दरांबाबत नवी माहिती समोर, आजचे भाव किती?

Sugar Price Hike : दिवाळीचा सण जवळ येत असताना सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. साखरेच्या किमतीत नेमकी किती वाढ झाली आणि आजचे ताजे दर काय आहेत, जाणून घ्या.
साखर दर
Sugar Rate

दिवाळी तोंडावर आली असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसू लागलेला आहे. गोडधोड बनवण्यासाठी लागणाऱ्या साखरेचे भाव कडाडलेले आहे. पुण्यात फक्त दहा दिवसातमध्ये किरकोळ बाजारात साखर थेट पाच रुपयांनी महागलेली आहे.

साखरेच्या दरांबाबत मोठी अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, आधी फक्त 54 रुपयांना मिळत असलेली साखर आता थेट 59 रुपये किलोवर गेलेली आहे. यामुळेच पाच किलो साखर घेताना ही ग्राहकाला 25 रुपये जास्त मोजावे लागत आहे. दिवाळीच्या दिवसात साखरेची मागणी जास्त वाढली तर हेच दर थेट 60 रुपये पार जातील, असा सध्या अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. घाऊक बाजारात पाहिलं तर हीच स्थिती आहे. पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशननुसार घाऊक दर हा 52 रुपयांवरुन 54 रुपयांवर पोहोचलेला आहे. तर कारखान्यातून साखर ही 50 रुपये किलोने विकली जात आहे.

हेही वाचा – भारतात E100 इंधनाच्या वापराला अधिकृत मंजुरी; फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा मार्ग मोकळा, सामान्य पेट्रोल गाड्यांसाठी वापर प्रतिबंधित

गेल्या वर्षी हा दर दिवाळीमध्ये फक्त 39 रुपये होता. दरवाढीमागे फक्त सणांची मागणी नाही. सध्या साखर उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे आणि उसातून रिकव्हरी यंदा तब्बल 10 टक्क्यांनी कमी झालेली आहे. त्यामुळे साखर पुरवठ्यावर दबाव आहे. तरीही ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version