धक्कादायक घटना! तापी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांच्या शोधमोहिमेला अखेर यश

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनंतर सापडला आहे.

धक्कादायक घटना! तापी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांच्या शोधमोहिमेला अखेर यश

धुळे प्रतिनिधी- तुषार परदेशी

सावळदे (ता. रावेर) – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर दोन दिवसांनंतर सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सावळदे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण संजय पाटील (रा. सावळदे) या तरुणाने दोन दिवसांपूर्वी तापी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली होती. घटना समजताच कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ तापी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली होती. स्थानिक मच्छीमार आणि तरुणांच्या मदतीने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर शोध घेतला जात होता.

हेही वाचा – भयंकर! वर्क फ्रॉम होमचं आमिष अन् सुरु भलताच खेळ; मुंबईत मोठं रॅकेट उघड

दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मृतदेह सापडल्याची वार्ता कळताच पाटील कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे.

या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान | Maharashtra Teacher and Graduate Constituency Election

मात्र या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number