छत्रपती संभाजीनगरात राजकीय खळबळ! ठाकरेंच्या नेत्यासह दोघांना अटक; नक्की घडलं तरी काय?

छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात ड्रेनेजलाइनच्या पाहणीवरून नगरसेवक गणेश लोखंडे आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुफान राडा झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात ड्रेनेजलाइनच्या पाहणीवरून नगरसेवक गणेश लोखंडे आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुफान राडा झाला. शुक्रवारी झालेल्या या घटनेत दोन्ही गटांकडून मारहाण आणि हत्यारांनी हल्ला करण्यात आला. यावेळी चाकूने वार केल्याचा तसेच घर आणि वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ड्रेनेज लाईनच्या कामाच्या पाहणीसाठी गेलेले नगरसेवक लोखंडे आणि स्थानिकांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या दरम्यान, चाकूने वार केल्याचेही समोर आले असून, दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा- ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ; आदित्य ठाकरे, अमित ठाकरे अन् अंजली दमानिया यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल

या गंभीर घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, या प्रकरणी छावणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत ठाकरे गटाचे नगरसेवक गणेश लोखंडे आणि अर्जुन लोखंडे यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे शहरातील नागरी कामांच्या अंमलबजावणीतील संभाव्य अडथळे आणि स्थानिक राजकारणातील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलिसांकडून सुरू असून, घटनेची संपूर्ण माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version