काळीज पिळवटणारी घटना! जन्मताच बाळानं जोडला जीव; मात्र जन्मदात्यांचाच अंत्यसंस्कार करण्यास नकार, हे कारण केलं समोर

नवरात्री सुरु असल्याने आमच्याकडे बाळाला स्पर्श करत नाहीत, असं कारण देत मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही आई-वडिलांनी नकार दिला.

काळीज पिळवटणारी घटना! जन्मताच बाळानं जोडला जीव; मात्र जन्मदात्यांचाच अंत्यसंस्कार करण्यास नकार, हे कारण केलं समोर
chhatrapati sambhajinagar baby news

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने चक्क आपल्या नवजात बालकाला स्पर्श करण्यास नकार दिल्याने परिसरात खळबळ माजली. बाळाचा जन्म होताच त्याचा मृत्यू असून या मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही आई-वडिलांनी नकार दिला. सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू असल्याने धार्मिक कारण देत त्यांनी बाळाला हात लावण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. अखेर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या निष्पाप बाळावर अंत्यविधी केल्याचे समजते. नवरात्री सुरु असल्याने आमच्याकडे बाळाला स्पर्श करत नाहीत, असं कारण देत मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही आई-वडिलांनी नकार दिला. त्यामुळे या चिमुकल्या बाळाच्या अंत्यविधीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाळाचा अंत्यविधीची पार पाडला. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने सगळेच हादरले आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! जयंत पाटील–फडणवीसांची चर्चा सुरु असताना पवारांनी जे केलं त्याने वेधलं सर्वांच लक्ष

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number