भंडाऱ्यात महाप्रसादानंतर गोंधळ! एकाच वेळी दीडशे ते दोनशे लोकांची प्रकृती खालावली; परिसरात खळबळ

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावामध्ये महाप्रसादाची जेवन घेतल्यानंतर गावातील दीडशे ते दोनशे नागरिकांची प्रकृती खालावली आहे.
Bhandara News
Bhandara News

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावामध्ये महाप्रसादाची जेवन घेतल्यानंतर गावातील दीडशे ते दोनशे नागरिकांची प्रकृती खालावली असून नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झालेला आहे.

महाप्रसादाचे जेवण घेतल्यानंतर तब्बल दीडशे ते दोनशे नागरिकांची प्रकृती खालावल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली असून अनेक नागरिक ग्रामीण व काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तसेच परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाने गावातच वैद्यकीय शिबिर (कॅम्प) आयोजित केले असून, बाधित नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, नागरिकांची प्रकृती बिघडण्यामागचे नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाप्रसादातून अन्नविषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version