सुट्टे मसाले विकताना आता करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ग्राहकांनी खरेदीपूर्वी नक्की पाहा

Tukaram Mundhe New Decision : अन्न आणि औषध प्रशासनाने सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे मसाला विक्रेते आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याचा बाजारपेठेवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुट्टे मसाले विकताना आता करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ग्राहकांनी खरेदीपूर्वी नक्की पाहा
Tukaram Mundhe

राज्यात आता सुट्टे मसाले विक्रीवर पू्र्णपणे निर्बंध येणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. नव्या नियमानुसार, दुकानदारांना सुट्टे मसाले विकता येणार नाहीत. जर मसाले विकायचे असल्यास त्यांना प्रत्येक पाकिटावर स्टिकर बंधनकारक असणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, त्या स्टिकरवर मसाला तयार केल्याची तारीख, एक्सपायरी डेट तसेच त्यामध्ये वापरलेल्या घटकांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असणार आहे. या नव्या निर्णयामुळे प्रत्येक ग्राहकांना भेसळमुक्त आणि सुरक्षित मसाले मिळू शकतील, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, दुसरीकडे यामुळे मसाल्यांच्या किंमती वाढण्याचीही शकत्या आहे. घरगुती दळण करणाऱ्या महिला आणि लहान विक्रेत्यांनी नेमके काय करायचे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number