24 तासांचा प्रवास 16 तासांत पूर्ण होणार! महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी धावणार; तिकीट आणि थांबे जाणून घ्या

Maharashtra Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याबाबत चर्चा सुरू असून, प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. या नव्या रेल्वेसेवेचा मार्ग, तिकीट दर आणि थांब्यांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन
Maharashtra Vande Bharat Sleeper Train

देशातील दुसरी आणि महाराष्ट्रामधील पहिलीच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावण्यासाठी आता सज्ज झालेली आहे. बंगळुरु-मुंबई स्लीपर वंदे भारतच्या उद्घाटनासाठी येत्या 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सवाचा मुहूर्त ठरवलेला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे.

ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट समोर
खरं तर दक्षिण भारतामधील ही पहिलीच स्लीपर वंदे भारत ठरणार आहे. या एक्सप्रेसमध्ये एकूण 16 डबे असणार आहे. ज्यामध्ये 11 एसी कोच, थ्री टियर, 4 एसी टू टियर तसेच 1 फर्स्ट क्लास डबा ही असणार आहे. एकूण 823 बर्थची क्षमता या नव्या ट्रेनमध्ये असणार आहे.

हेही वाचा – दिवाळीनंतर महागाईचा मोठा झटका; स्कूल अन् खासगी बसच्या भाड्यात होणार 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ

तिकीट किती असणार?
महत्त्वाचे म्हणजे 1,118 किमीच्या प्रवासासाठी साधारण तिकीट दर हा 2 हजार 600 ते 4 हजार 250 रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. मात्र, हे अधिकृत दर अजूनही जाहीर झालेले नाहीत.

असं असेल वेळापत्रक
वेळापत्रकानुसार, ही ट्रेन केएसआर बंगळुरुहून रात्री 10 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात सीएसएमटीहून रात्री 10.30 वाजता सुटून ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी 2.50 वाजता बंगळुरुला पोहोचेल. सध्या या मार्गावर पाहिलं तर उद्यान एक्स्प्रेस असून तिला तब्बल 24 ते 25 तास प्रवासासाठी लागतात. या वंदे भारत स्लीपरमुळे प्रवाशांचा प्रवास फक्त 16 तासांमध्येच पूर्ण होणार आहे.

हेही वाचा – कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपडेट; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत फेरबदल

हे असतील थांबे
ही वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेन अनंतपूर, गुंटकल, रायचूक, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या स्थानकांवर थांबणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version