मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सूचनेनुसार, मेट्रो -7अ प्रकल्पाच्या कामांमुळे मुंबईतील काही भागांमध्ये 22 जूनपासून 28 जूनपर्यंत आठवडाभर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विलेपार्ले (पूर्व) आणि अंधेरी परिसरात मुख्यत्वे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, के पूर्व विभागातील काही भागांमध्येही संध्याकाळी पाण्याचा दाब कमी राहणार आहे.
हेही वाचा: Operation Sindhu: इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र खुले केले; 1000 भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, विलेपार्ले (पूर्व) भागात दररोज संध्याकाळी 5.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच, जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी स्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्ग) या भागांमध्ये रात्री 8.00 ते 9.30 वाजेदरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाईल.
हेही वाचा: International Yoga Day 2025: आळस, थकवा आणि तणाव दूर ठेवण्यासाठी 'ही' 10 योगासने उपयुक्त; जाणून घ्या
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेता नागरिकांनी सहकार्य करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.