Friday, February 13, 2026 06:48:34 PM

Sumit Kapur Daughter Post: 'नाना कुठे गेले...?' अजित पवारांच्या पायलटच्या लेकीची काळजाला भिडणारी पोस्ट

या भीषण दुर्घटनेत विमानाचे पायलट कॅप्टन सुमीत कपूर यांचाही अंत झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या सान्या कपूर वाधवा हिने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना वाचून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे

sumit kapur daughter post नाना कुठे गेले अजित पवारांच्या पायलटच्या लेकीची काळजाला भिडणारी पोस्ट

Sumit Kapur Daughter Post: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर या अपघातात प्राण गमावलेल्या निष्पाप कर्मचाऱ्यांची कुटुंबेही उद्ध्वस्त झाली आहेत. या भीषण दुर्घटनेत विमानाचे पायलट कॅप्टन सुमीत कपूर यांचाही अंत झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या सान्या कपूर वाधवा हिने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना वाचून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

"माझाच विश्वास बसत नाहीये..."
सान्या कपूर हिने इन्स्टाग्रामवर वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या चिमुकल्या मुलीचा (समायराचा) उल्लेख करत म्हटलं आहे की, 'माझ्या लेकीने उच्चारलेले पहिले दोन शब्द 'दादा' आणि 'नाना' होते. तिचं तिच्या आजोबांवर अतोनात प्रेम होतं. आज जेव्हा तिने 'नाना' कुठे आहेत असं विचारलं, तेव्हा तिला काय सांगू हेच मला कळेनासं झालं आहे.' सान्या पुढे लिहिते, 'बाबा, तुम्ही आम्हाला सोडून गेलात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आम्हाला तुमची प्रत्येक क्षणाला आठवण येतेय.'

हेही वाचा - Ajit Pawar Last Video: अजितदादांचा विमान अपघाताआधीचा 'तो' शेवटचा व्हिडिओ आला समोर; काय म्हणाले होते ? पाहा

'आकाशावर होतं जिवापाड प्रेम' 
कॅप्टन कपूर यांना विमानांची आणि आकाशात झेपावण्याची प्रचंड ओढ होती. त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा अभिमान व्यक्त करताना सान्याने म्हटलं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अजित पवारांसह देशातील अनेक बडे मंत्री आणि सुपरस्टार्सना सुरक्षित प्रवास घडवून आणला होता. मी नेहमी पप्पांना म्हणायचे की मला तुमचा खूप अभिमान आहे. आजही आणि उद्याही मला तुमचा तेवढाच अभिमान राहील. ते आकाशात उडण्यासाठीच बनले होते, अशा शब्दांत तिने आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.

महाराष्ट्रावर शोककळा
अजित पवार यांच्यासोबतच या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांचेचं कुटुंब उघड्यावर पडले आहेत. एकीकडे महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहत असतानाच, दुसरीकडे या पडद्यामागच्या नायकांच्या कथा समोर येत असल्याने जनमानस हळहळत आहे. 


सम्बन्धित सामग्री