महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Oct 2026 06:52 AM (IST)

    ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!

    दिवाळीच्या सणासुदीत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर परिसरातील खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल १४ लाख ८ हजार रुपयांचे ६ हजार २८० लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले असून, संबंधित युनिटचा अन्न परवानाही निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि इतर गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

  • 25 Oct 2026 06:52 AM (IST)

    नवीन मोंढ्यात FDA ची धडक! १.२९ लाखांची ४३१ किलो खोबरे पावडर जप्त

    सणासुदीच्या काळात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई तीव्र केली आहे. जाधववाडीतील नवीन मोंढा परिसरातील मे. बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला या प्रतिष्ठानावर छापा टाकून १ लाख २९ हजार ३०० रुपये किमतीची ४३१ किलो खोबरे पावडर जप्त करण्यात आली. संबंधित प्रतिष्ठानाचा अन्न परवानाही तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

  • 25 Oct 2026 06:51 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर दोन भीषण घटना, अज्ञात वाहनाला कारची मागून जोरदार धडक, चालकाचा मृत्यू

    वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात! एका भीषण धडकेत एर्टिगा कारचालकाचा जागीच मृत्यू, तर दुसरीकडे स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने अपघात! सुदैवाने दुसऱ्या अपघातात जीवितहानी टळली. मृत्यू झालेल्या कारचालकाला धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number