मुंबईतील रस्ते अपघात रोखण्यासाठी BMC ने सुरक्षा उपाययोजनांची आखणी केली आहे. या प्रकल्पामध्ये उच्च जोखमीच्या चौकांमधील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच रस्ता सुशोभीकरण व स्थानिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इतर कामे नियोजित केली गेली आहेत.
पोलीस सहआयुक्त (वाहतूक) यांच्या कार्यालयाने दिलेल्या यादीतून 48 धोकादायक ठिकाणे (ब्लॅक स्पॉट्स) ओळखण्यात आली आहेत. ही ठिकाणे बीएमसीच्या शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर विभागांमध्ये पसरलेली आहेत. हे 48 ब्लॅक स्पॉट सुरक्षित करण्यासाठी BMC 18.25 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे वाढती अपघातांची संख्या रोखली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
मुंबईतील कोणत्या मार्गांवर उपाययोजना?
याअंतर्गत अमर महल जंक्शन, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, किंग्ज सर्कल आणि सायन सर्कल यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच याबरोबरच रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पृष्ठभाग सपाट करणे आणि पादचारी मार्ग सुधारणे यावरही भर दिला जाणार आहे.
हेही वाचा - लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! राज्य सरकारकडून निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार 1500 रुपये?
इतर कामे -
माहिम जंक्शनसह काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे आणि असमान पृष्ठभागामुळे अपघातांचा धोका असल्याने, अपघात रोखण्यासाठी रस्ता दुभाजकांची सुधारणा आणि थर्मोप्लास्टिक रोड मार्किंगही करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.