मध्य रेल्वेच्या गोंधळानंतर आजचा दिवस कसा? प्रवाशांचं लक्ष महत्त्वाच्या अपडेटकडे

Central Railway Update : काल दिवसभर मध्य रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. अनेक तासांच्या खोळंब्यानंतर आज पहाटेपासून रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. मात्र, कालच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि रेल्वे प्रशासनाच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मध्य रेल्वेच्या गोंधळानंतर आजचा दिवस कसा? प्रवाशांचं लक्ष महत्त्वाच्या अपडेटकडे
Central Railway

सोमवारी दिवसभर खोळंबलेली मध्य रेल्वेची सेवा आज पहाटेपासून सुरळीत झाली आहे. कालच्या बिघाडामुळे लाखो प्रवाशांचे मोठे हाल झाले, असंख्य लोक तासन्तास स्थानकांवर अडकून पडलेले होते. या सर्व गोंधळात एक मोठी दुर्घटना देखील घडली. मात्र कालच्या या गोंधळात तीन जणांनी आपला जीव गमावला आहे.

या संपूर्ण घटनेमुळे संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मध्य रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
लोकल प्रवाशांच्या जीवाशी खेळ का केला जातोय, असा सवाल करत नातेवाईकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number