BMC मुख्यालयात खळबळ! महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
mayor's office threatening a bomb blast
mayor's office threatening a bomb blast

मुंबई : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये 31 ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांची नावे घेण्यात आली असून, ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांकडून ई-मेलची सत्यता, तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का, की केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : ‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य

काय आहे मेलमध्ये?

मुंबई बॉम्बे बोलेगा – खलिस्तान झिंदाबाद!
मुंबई महापौर कार्यालय – दुपारी 3.11 वाजता
शाळा – दुपारी 1.11 वाजता
आपल्या मुलांना वाचवा.
31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान बच्चन यांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकी
31 ऑक्टोबर रोजी, 1984 मध्ये ‘खून का बदला खून’ अशी घोषणा देऊन शीख समुदायाच्या नरसंहाराला कारणीभूत ठरल्याचा आरोप केलेल्या बच्चन यांच्यावर ग्रेनेड हल्ला करून त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ला करून दलजीत दोसांझ यांना संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. शीख समुदायाच्या नरसंहाराला कारणीभूत ठरलेल्या बच्चन यांच्या पाया पडल्याचा आरोपही ईमेलमध्ये करण्यात आला आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे 27 नोव्हेंबरला बॉम्बस्फोट घडवून दलजीत दोसांझ यांना ठार मारण्याची धमकी.

ई-मेलच्या शेवटी खालील नावे आणि संघटनांचा उल्लेख – 

खलिस्तान नॅशनल आर्मी
इंजि. गुरुनानक सिंह
रुकन शाहवाला
डॉ. गुरनिर्वैर सिंह
खान राजादा
बब्बर खालसा (परमार-कॅनडा)
प्रा. गुरकाल सिंह, पीएचडी
खेम करण
प्रा. गुरंगार सिंह
जंडियाला गुरु

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version