दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक का मानतात? जाणून घ्या विजयादशमीच्या पूजेची योग्य वेळ

नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी, म्हणजेच विजयादशमीला दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अधर्मावर धर्माचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय, ही या सणामागील मूळ संकल्पना आहे.
दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक का मानतात? जाणून घ्या विजयादशमीच्या पूजेची योग्य वेळ

नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी, म्हणजेच विजयादशमीला दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अधर्मावर धर्माचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय, ही या सणामागील मूळ संकल्पना आहे. या दिवशी शस्त्रे, वह्या-पुस्तके आणि कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचे पूजन केले जाते. घराच्या भरभराटीत आणि दैनंदिन कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वस्तूंना हळद-कुंकू लावून, फुलांचे हार अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. तसेच विद्येची देवता देवी सरस्वतीचीही आराधना केली जाते.

हिंदू धर्मात दसरा हा केवळ सण नाही, तर तो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी पंचांग न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येते, अशी मान्यता आहे.

साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार साडेतीन मुहूर्तांमध्ये 3 पूर्ण आणि एक अर्धा मुहूर्त धरला जातो.
1. गुढीपाडवा – हिंदू नववर्षाची सुरुवात
2. अक्षय्य तृतीया – या दिवशी केलेले कार्य कधीच क्षय होत नाही, अक्षय्य राहते
3. विजयादशमी / दसरा – वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस
4. अर्धा मुहूर्त – दिवाळी पाडवा / बलिप्रतिपदा

हेही वाचा – दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची तयारी सुरू आहे? शोरूममध्ये बुकिंग करण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

दसऱ्याला साडेतीन मुहूर्तात का मानतात?

साडेतीन मुहूर्तांची संकल्पना अशी आहे की, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा या तीन दिवसांत केलेली कोणतीही नवी सुरुवात, व्यापार, सोने खरेदी किंवा गृहप्रवेश हा अत्यंत फलदायी आणि समृद्धी आणणारा ठरतो.

  • मुहूर्त न पाहता शुभ कार्य: दसऱ्याला पंचांग न पाहताही नवीन काम सुरू करता येते. लग्न हा अपवाद वगळता घर खरेदी, दुकान सुरू करणे, वाहन आणि सोने खरेदी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.
  • विजयाचा दिवस: याच दिवशी प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. त्यामुळे या दिवशी सुरू केलेल्या कामात यश नक्की मिळते, अशी श्रद्धा आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

याच कारणामुळे पूर्वीच्या काळी राजे-महाराजे युद्धासाठी सीमोल्लंघन याच दसऱ्याच्या मुहूर्तावर करत असत.

यंदाच्या दसऱ्याचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा होतो. यंदा दशमी तिथी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी संपणार आहे.

यातील विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 19 मिनिटांपासून ते 3 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात शस्त्रपूजन आणि नवीन कामाची सुरुवात करणे सर्वात शुभ मानले जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version