शारदीय नवरात्रोत्सवासाठी नाशिकचे शक्तीपीठ सज्ज; 11 ऑक्टोबरपासून लाखो भाविकांची मांदियाळी, 24 तास मंदिर खुलं राहणार

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या शक्तिपीठांचा जागर केला जातो. यातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणजे नाशिकची सप्तशृंगी देवी.
शारदीय नवरात्रोत्सवासाठी नाशिकचे शक्तीपीठ सज्ज; 11 ऑक्टोबरपासून लाखो भाविकांची मांदियाळी, 24 तास मंदिर खुलं राहणार

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या शक्तिपीठांचा जागर केला जातो. यातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणजे नाशिकची सप्तशृंगी देवी. आई सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.

नाशिकमध्ये 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होणार आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला असून आकर्षक सजावट करण्यात येत आहे.

हेही वाचा – नवरात्रीचे नऊ दिवस घट आणि अखंड दिव्याला विशेष महत्त्व! ‘या’ पवित्र परंपरेमागचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

भाविकांसाठी ट्रस्टच्या वतीने विशेष सुविधा:

  1. भाविकांच्या सुरक्षेसाठी गडावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  2. ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत.
  3. नवरात्रोत्सव काळात गडावर खासगी वाहनांना बंदी असणार आहे.
  4. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असून, रोप-वे सेवा देखील सुरू राहणार आहे.

सध्या थेट सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या तयारीचा जल्लोष सुरू असून, भाविक देवीच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version