महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी! उमेदवार सतीश चव्हाण यांच्या जाहिरातीतून अब्दुल सत्तार गायब; मविआतील उमेदवाराच्या प्रचारामुळे चर्चांना उधाण

सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची जाहिरात प्रसिद्ध झाली असून आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव किंवा छायाचित्र नसल्याचे दिसून आले.

महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी! उमेदवार सतीश चव्हाण यांच्या जाहिरातीतून अब्दुल सत्तार गायब; मविआतील उमेदवाराच्या प्रचारामुळे चर्चांना उधाण
mla abdul sattar

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर :  मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुतीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडली असून या मतदारसंघातून सतीश चव्हाण निवडणूक लढवत आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतल्याचे दिसून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून सतीश चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली असताना, मित्रपक्षातील आमदाराने विरोधी गटाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने महायुतीच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवं वळण! दोन महिलांना अटक; दादरला उतरल्या, हॉटेलमध्ये थांबल्या अन् बॅगेतून…

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज एका वर्तमानपत्रात सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र, या जाहिरातीत आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव किंवा छायाचित्र नसल्याचे दिसून आले. सत्तार यांना जाहिरातीतून जाणीवपूर्वक डावलण्यात आले का, की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. एका बाजूला महायुतीचा अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असताना, दुसऱ्या बाजूला मित्रपक्षातील आमदाराची भूमिका चर्चेत आल्याने युतीतील समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जाहिरातीतून सत्तार यांना वगळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणावर महायुतीतील संबंधित नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्याशिवाय अंतर्गत नाराजीबाबत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number