रायगडात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष कायम असल्याचं चित्र आहे. विशेषतः अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत असतात. विकासकामांच्या श्रेयावरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होतं.
हेही वाचा- 500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाक युद्ध थांबायचं नाव घेत नाही. आता तटकरे यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व लोकांना मान्य नाही त्यांनी आता सबुरीने घ्याव आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असा खोचक सल्ला आमदार महेंद्र दळवी यांनी दिला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिकेत तटकरेंनी सुनील तटकरे यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडला. दळवी यांनी अनेकदा तटकरे साहेबांचे मार्गदर्शन घेतलं आहे. यापुढेही त्यांचे मार्गदर्शन राहील , असं अनिकेत तटकरे म्हणाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही खटके उडत असून आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.