केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर; मतदान अन् निकालाची तारीख समोर

या महत्त्वपूर्ण जागेसाठी येत्या 12 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर; मतदान अन् निकालाची तारीख समोर
Rajya Sabha bypoll 2026

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण जागेसाठी येत्या 12 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे. डॉ. मुरुगन यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2030 पर्यंत शिल्लक होता, परंतु त्यांनी मध्य प्रदेशातून मिळालेल्या राज्यसभा सदस्यत्वाचा आणि केंद्रीय मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक वेळापत्रक आणि महत्त्वाची प्रक्रिया

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, या पोटनिवडणुकीची अधिकृत अधिसूचना 26 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केली जाईल. इच्छुकांना 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2026 रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. 12 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन तात्काळ निकाल जाहीर केला जाईल.

हेही वाचा – 500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?

तामिळनाडूत पक्षसंघटना मजबुतीसाठी मुरुगन यांचा राजीनामा

डॉ. एल. मुरुगन यांनी 13 ऑक्टोबर रोजी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. सोशल मीडियावर हे पत्र शेअर करत त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. तामिळनाडूच्या प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात जाऊन पक्षविस्तारासाठी पूर्ण वेळ देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील जबाबदारीतून मुक्त होऊन मूळ राज्यात राजकीय पकड मजबूत करण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे दक्षिणेतील राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number