‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांचा ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य
cm devendra fadnavis manoj jarange patil

नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल 500 कोटी रुपयांचा ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी या ऑडिओ क्लिपची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच भाजपच्या काही नेत्यांनीदेखील ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. परिणामी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : भयंकर! वर्क फ्रॉम होमचं आमिष अन् सुरु भलताच खेळ; मुंबईत मोठं रॅकेट उघड

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

अडीच वर्षानंतर आता संभाषण बाहेर येण्यामागे नेमके हेतू काय आणि कोणाला टार्गेट आणि कशाला केलं जात आहे? या संदर्भातील अनेक प्रश्न आहे. त्याच्या चौकशीची मागणी जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. त्याची पूर्ण चौकशी करून यातील जे सत्य असेल ते आम्ही बाहेर काढू. जे काही संभाषण किंवा ऑडिओ क्लिप समोर आली आहे, तिची पूर्ण फॉरेन्सिक चौकशी केली जाईल. यासंदर्भात जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पूर्ण चौकशी करून यामागील जे काही सत्य असेल ते आम्ही जनतेसमोर आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number