CJP चा तिरंगा मोर्चा 16 ऑक्टोबरला; अभिजित दीपकेंचे मोठे आवाहन, आंदोलन कुठे होणार? जाणून घ्या

CJP चे नेते अभिजित दिपके यांनी काल मोठी घोषणा केली.

CJP चा तिरंगा मोर्चा 16 ऑक्टोबरला; अभिजित दीपकेंचे मोठे आवाहन, आंदोलन कुठे होणार? जाणून घ्या

CJP चे नेते अभिजित दिपके यांनी काल एक मोठी घोषणा केली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल जंतर-मंतर येथे तिरंगा फडकावल्यामुळे आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईच्या विरोधात अभिजित दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अटकेच्या निषेधार्थ CJP ने 16 ऑक्टोबरला देशभरात संप करण्याची घोषणा केली आहे. या संपात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलन कुठे?
अभिजित दीपकेंनी केलेल्या घोषणेनुसार, १६ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीतील सेंन्ट्रल पार्क, कनॉट प्लेस ला तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तसेच ज्यांना दिल्लीला येणे शक्य नाहीय त्यांन ‘तिरंगा मार्च’ करा, असे आवाहन केले.

हेही वाचा – मुंबईत विद्यार्थी संघटना आक्रमक; CJP नेत्यांच्या अटकेचा निषेध, ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन

आंदोलनाचा मुख्य उद्देश:
अभिजित दीपके यांच्या म्हणण्यानुसार, तिरंगा फडकावून हे दाखवून द्यायचे आहे की, तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही, तर तो देशाचा अभिमान आहे.
पुढे अभिजित दीपके म्हणाले, “यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतले, तरी मला फरक पडणार नाही; कारण तिरंगा फडकावणे ही माझी शान आहे.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number