500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांची तातडीची कारवाई! मुंबई पोलिसांना दिले थेट आदेश

मनोज जरांगे यांनी बाहेर काढलेल्या 500 कोटीच्या आरोपांच्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश जारी केला आहे.

500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांची तातडीची कारवाई! मुंबई पोलिसांना दिले थेट आदेश
Devendra Fadnavis

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांनी बाहेर काढलेल्या काही ऑडिओ क्लीपमुळे 500 कोटीच्या आरोपांवरुन मोठा वादंग सुरु झाला आहे. या ऑडिओ क्लिपवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. दरम्यान आता याच ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश जारी केला आहे. या आदेशानंतर आता या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेच्या 500 कोटींचे आरोप आणि कथित ध्वनिफीत प्रकरणी एसआयटी गठित करा असे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

फडणवीसांच्या सुचनेनंतर आता पोलिसांचे एक विशेष पथक जरांगेनी आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी करेल. तसेच या विशेष पथकाकडून संबंधित ऑडिओ क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे? हे तपासण्यात येईल. मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लीपचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना दिलेल्या आदेशानंतर या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगेंची ED चौकशीची मागणी; म्हणाले, ‘तुमची यंत्रणा काय करते…’

यावर आता मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की “गैरसमज पसरतो का? हे पाहतायत. AI म्हणून प्रयोग सुरू आहे पण उपयोग होणार नाही. तुमचं माझ्याकडे खुप काही आहे. शिंदे साहेब तर जाहिर म्हणाले मी घेतले नाहीत.. तर त्या दोघांनी आता बघावं. त्यांनी जर दिलेले असले तर ते पण शांत बसणार नाहीत. देवेंद्र फडणवीस कोणाला पाठीशी घालतात असं सध्या वाटत नाही, त्यांना हि माहिती नसावी‌. भाजप संपवु पाहतंय का? असं ते म्हणतायत म्हणजे यांच्या मागे मोठी संस्था, ताकद वाटते.”

“मग फडणवीसांना संपवण्याचा किंवा शिंदेंना संपवण्याचा कोणाचा डाव होता का? किंवा आमचं आंदोलन चिरडण्याचा. ब्राम्हणाचा काय संबंध आहे याच्यात? आपल्या क्लीप खोट्या आणि झाडंही खोटे फक्त यांचंच खरं आहे. ते म्हणाले ना 33 कोटी झाडं लावणार. परदेशात माझा काळा पैसा, ते मोदी साहेब आणुन वाटप करणार आहेत. मला पण आरोप केल्यावर ज्या त्या भाषेत उत्तर द्यावं लागणार. मराठ्यांच्या महिलांची इज्जत करणार नसाल तर त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number