राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि दुष्काळाचे संकट यामुळे खर्चात कपात करण्याच्या हालचाली सुरू असताना आता दुसरीकडे नागपूरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशन खर्चात 42 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- “मला पण भाजपची ऑफर आली होती, पण…” काँग्रेसच्या ‘त्या’ माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा
गेल्या काही वर्षांत पुरवणी मागण्यांचा आलेख प्रचंड वाढत चालला आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) गुरुवारी रात्री 42.15 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कामांना मंजुरी दिली.
त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीवरील खर्च 86.90 कोटींवरून थेट 129.05 कोटी रुपयांवर जाणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या खर्चकपातीच्या भूमिकेवर या निर्णयामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राज्यात दुष्काळाचे गंभीर संकट असताना अधिवेशनाच्या खर्चात वाढ झाल्याने टीका होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.